शिरुर दिनांक ( वार्ताहर )बोथरा परीवारांचे प्रथम संमेलन पुण्यामध्ये संपन्न झाले यावेळी अध्यक्षपदी कांतीलालजी बोथरा यांची एकमताने निवड झाली .
या प्रथम संमेलनाचे आयोजन शिरूर व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल पन्नालाल बोथरा यांनी केले , हे संम्मेलन होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरात कांतीलाल बोथरा यांनी दौरा करून सर्व बोथरा परीवारांची माहिती मिळवून या संम्मेलनासाठी निमंत्रण दिले होते, संम्मेलनासाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव , धुळे, नाशिक, पुणे, सांगली, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यातील विविध भागातून अंदाजे सातशे ते आठशे बोथरा परीवारातील सदस्य आले होते, या कार्यक्रमाची सुरुवात महेश लुंकड यांनी आपल्या संगीतमय नवकार महामंत्राने करून दिली, त्यानंतर बोथरा परीवाराची कार्यकारिणीचा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला,या कार्यकारणीच्या अध्यक्षपदासाठी कांतीलाल बोथरा यांचे नाव सर्वानुमते , दिलीप बोथरा यांनी मांडले,त्याला अभय बोथरा यांनी अनुमोदन दिले, त्यानंतर कांतीलालजी बोथरा यांची एकमताने अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली .यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्याध्यक्षपदी गुळाचे व्यापारी व प्रसिद्ध उद्योजक श जवाहरलाल बोथरा यांची तर उपाध्यक्षपदी अहमदनगर येथील पारस उद्योग समूहाचे संचालक व बडी साजन ओसवाल जैन संस्थेचे अध्यक्ष प्रेमराजजी बोथरा, सेक्रेटरी म्हणून बालमटाकळी -पुणे येथील संतोष बोथरा , सह-सेक्रेटरीपदी राजगुरुनगर येथील संतोष बोथरा , खजिनदार पदी चाकण येथील अभय बोथरा यांची नावे जाहीर करण्यात आली .