मुरमा फाटा येथे मराठा बांधवांकडून रस्ता रोको
पाचोड (विजय चिडे) जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानूष मारहाण केल्या प्रकरणी निषेध तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज( दि.४) रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला असून यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा बाजी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाला सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेला हल्ला या प्रकरणाचे पडसाद पैठण तालुक्यात उमटले आहेत. मराठा समाजातर्फे मुरमा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, यावेळी सरकारचा निषेध करत दोषींवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्या घटनेचा मराठा समाजाच्या वतीने जागोजागी निषेध केला जात आहे. पैठण तालुक्यातील मुरमा, कोळीबोडखा सह परीसरातील मराठा समाजाच्या शेकडो तरुणांनी एकत्र येत या अमानुष घटनेचा निषेध करण्यात आला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरुणांची गर्दी जमली होती, यानंतर महसुल विभागाचे मंडळधिकारी श्री.केकाण, तलाठी सीमा राजाळे,अनूया कावळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. यावेळी दिनकर मापारी, एकनाथ फटांगडे, बप्पासाहेब चावरे, भाऊसाहेब चिडे,अशोक भेरे,संपत चावरे, सचिन लेंभे, निलेश चिडे, ज्ञानेश्वर थावर, सुरेश मापारी, रामनाथ लेंभे, सुनिल मानमोडे, गोपीचंद पांगरे, गणेश नेमाणे,लहु चिडे,सनी मापारी, अंगद लेंभे,सोमनाथ बाबरे,गणेश मापारी, जालिंदर डवणे, संतोष फटांगडे, कैलास चिडे, योगेश मापारी,भरत मानमोडे यांच्या सह परिसरात शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्याकडुन तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.