गजानन गव्हाणे पाटील
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आदर्श ग्रुप ग्रामपंचायत वळके, ता. मुरुड, जि. रायगड आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल चणेरे, ता. रोहा, जि. रायगड मधील मुलींची यशस्वी कामगिरी केली असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे यांनी दिली.
" आत्मनिर्भर भारत" या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विविध ठिकाणच्या 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील मोठ्या गटात उत्तेजनार्थ ::-- प्रियदा सुरेश केळसकर (इयत्ता 10 वी, तुकडी - ब) किर्ती गजानन सुतार (इयत्ता 10 वी, तुकडी - ब) तर विशाखा हेमंत बिरवाडकर (इयत्ता 10 वी, तुकडी - ब) हिला सहभाग प्रमाणपत्र मिळाले आहे.
स्पर्धकांना विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक शिवाजी जोंधळे, गणेश नांगरे, राजेंद्र चव्हाण, कविता कदम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन ग्रामपंचायत वळके चे आदर्श सरपंच किशोर नथुराम काजारे, ग्रामसेवक अमोल भालचंद्र पाटील तसेच समस्त ग्रामस्थ वळके यांनी केले होते. न्यू इंग्लिश स्कूल चणेरे चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. जोंधळे शिवाजी कारभारी यांनी सर्व यशस्वी स्पर्धेकांचे अभिनंदन करत व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.