शिरुर दिनंक ( वार्ताहर ) येथील प्रीतम प्रकाशनगर मधील तेजस शामसुंदर चिखलीकर हा वयाच्या 21 व्या वर्षी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून त्याची पाटबंधारे विभागात वर्ग -१ च्या अधिकारी म्हणुन निवड झाल्याबद्दल रसिक विचार मंच शिरुरचा वतीने सत्कार करण्यात आला .त्याच बरोबर बी. जे. मेडिकल कॉलेजला एमबीबीएस करिता निवड झालेले मिहीर देवल शहा याला ही सन्मानित करण्यात आले तेजस यांचे वडील शामसुंदर हे इंजिनिअर असुन शिरुर येथे बांधकाम व्यवसायीक आहेत. त्याची पत्नी दिपाली गृहिणी असून मुलगी कु .प्राची ही शिक्षण घेत आहे . तेजस हा सन २०१० मध्ये इयत्ता ४थी च्या स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात ७ वा आला होता .त्यानंतर ५ व्या इयत्तेसाठी त्याची निवड ज्ञानप्रबोधीनी , सदाशिव पेठ पुणे येथे झाली . पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिअरिंग मध्ये सलग ४ वर्षे टॉपर असलेला तेजस सीओपीचा सुवर्णपदक विजेता आहे . तेजसचा गेटमध्ये देशपातळीवर २००वा रँक होता .तेजस बी.टेक. सिव्हील झाला असुन आय.आय.टी. पवई येथे एम. टेक .साठी निवड झाली होती . परंतु प्रशासकीय सेवेत जाण्याचा ओढीने एम.पी.एस.सी. च्या अभ्यास करण्याचा निर्णय घेवुन परीक्षेची तयारी त्याने सुरु केली त्याखेरीज पी.एस.यु. मधील २० ते २५ लाखांच्या पॅकेजची संधी सोडली आणि एम .पी .एस .सी . च्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले व वयाच्या २१ व्या वर्षी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला . पाटबंधारे खात्यात क्लास वन अधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे . सध्या तेजस हे यु.पी.एस.सी च्या परीक्षेचा अभ्यास करीत आहे. एमबीबीएस करिता निवड झालेल्या मिहीर शहा याने ही सातत्यपूर्ण अभ्यास व जिद्द चिकाटीने आपल्या शैक्षणिक प्रवास सुरु केलेल्या आहे . यावेळी तेजस चिखलीकर व मिहिर शहाच्या वतीने त्याचे वडिल देवल शहा यांच्या सन्मान रसिक विचार मंच शिरुरचे सुनील धाडीवाल , बांधकाम व्यवसायिक संदिप बिहाणी , प्राचार्य अमोल शहा , सनदी लेखापाल सुनील यल्लोळ , विनोद बोथरा , चंद्रकांत कनिंगध्वज , सागर नरवडे, महेंद्र ढेरे व प्रा.सतीश धुमाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला . प्रास्ताविक प्रा . सतीश धुमाळ यांनी केले .त्यात त्यांनी सांगितले की तेजस ने अवघ्या २१ व्या वर्षी यश संपाद्न केले हे कौतुकास्पद आहे. जिद्द कष्ट करण्याची तयारी व सातत्य असेल तर यश मिळतेच . रसिक विचार मंचचा वतीने शैक्षणिक , सामाजिक आरोग्य प्रशासनासह विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणा- याच्या सन्मान करण्या बरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले . यशाबद्दल तेजस यानी सांगितले की आई वडिलांचे व गुरुजनाचे योग्य मार्गदर्शन , अभ्यासातील सातत्य , सकारात्मक विचार ,वेळेचे योग्य नियोजन या बाबीनमुळे यश प्राप्त केले . यावेळी स्वागत संदिप बिहाणी यांनी केले तर आभार प्राचार्य अमोल शहा यांनी मानले . फोटो ओळी २१ व्या वर्षी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणारे तेजस चिखलीकर व एमबीबीएस करिता निवड झालेल्या मिहीर शहा यांच्या सन्मान रसिक विचार मंच शिरुरचा वतीने करण्यात आला .