कल्याणनगर मध्ये येथील किराणा दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

"घरातील गॅस सिलेंडरचाझाल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली टळली"

पाचोड (विजय चिडे) किराणा दुकानात अचानक आग लागुन या आगीच्या भक्षस्थानी सुमारे २० हजार रुपयांचे नगद रोकड, दुकानतील किरणां सामन, फ्रिज सह घरातील साहित्य असा सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी(दि.१)रोजी दुपारी एकच्या सुमारास पाचोड ता.पैठण येथील कल्याणनगरमध्ये घडली. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापही समजले नाही.

याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार, पाचोडच्या कल्याणनगर येथील बाप्पासाहेब भाऊसाहेब वाढेकर हे गेल्या अनेक वर्षापासून किराणा दुकान चालवत आहे यांच्याकडे या दुकानाव्यतिरिक्त आपली उपजीविका चालविण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रावारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बप्पासाहेब वाढेकर यांच्या दुकानात अचानक आग लागली पाहता पाहता आगीने भयंकर रूप धारण केल्याने आगीच्या भक्षस्थानी पडले.यात सुमारे २० हजार रुपयांचे नगद रोकड, दुकानतील किरणां सामन, फ्रिज, घरातील साहित्य असा सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले असल्याने त्यांनी सांगितले आहे. वाढेकर यांना किराणा दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी दुकानाकडे धाव घेऊन गावातील नागरिकांच्या मदतीने दुकानातील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी किरण कोरडे, पवन बनसोडे, मुक्तार बागवान,शरद अहिरे,सचिन हरेर,किशोर भालशिंगे, सोहेल शेख, कैलास जाधव, इमरान पटेल या तरुणांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी मोठे पर्यंत केले असून आग आटोक्यात आणली आहे. मात्र, तोपर्यंत या भीषण आगीत दुकानातील सुमारे पाच लाखांचे पेक्षा जास्त रुपये किराणा माल जळून भस्मसात झाला. महत्वाची बाब म्हणजे घरामध्ये गॅस सिलेंडर होता. मात्र त्याचा स्पोट न झाल्याने मोठी दुर्दैवी घटना टळली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे,पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक सुरेश माळी, महावितरणचे सहाय्यक अभियंता काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे.