q शिरुर दिनांक (वार्ताहर )प्रामाणिक ,कष्टकरी हातांना दिला राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान...! नेहमी वेगळेपणा व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर ने या ही वेळी १५ ऑगस्ट ला समाजापुढे एक आदर्श उभा केला.आपले कर्तव्य पार पाडण्यात ,कठोर परिश्रमासोबत निष्ठा आणि सत्याच्या मार्गाचे अनुकर करणार्‍यां प्रामाणिक ,कष्टकरी हातांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान दिला . व्हिजन इंटरनॅशनल स्कूल कडून ध्वजारोहणाच्या दिवशी प्रमुख पाहुणे परेश सुराणा, रामराज चव्हाण, बाळू पडवळ, हिरामण आदक यांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. परेश सुराणा यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बाजरीच्या कट्टयामध्ये दीड तोळ्याचे मंगळसूत्र सापडले होते. त्यांनी ते दुकानाचे मालक परेश सुराणा यांना परत केले आणि दाखवून दिले की जगामध्ये अजूनही इमानदारी जिवंत आहे .त्यांनी समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे. प्रामाणिकपणा हा कोणत्याही कामाचा अंगभूत आणि आवश्यक असा गुण आहे. तो नसेल तर कोणतंही काम अपूर्णच राहील,याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे परेश सुराणा यांनी पटवून दिले. यावेळी व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर सुवालाल पोखरणा, प्रिन्सिपल पसक्वीन काशी, सतीश गावडे आदी उपस्थित होते