शेतकरी राजा सारा देश स्वातंत्र्याची ७५वर्षे धूमधडाक्यात साजरा करीत आहे.आज देशात फक्त आणि फक्त तुझीच लूट सुरू आहे त्यामुळे तुला कळत नाही की तू आनंद साजरा करावा की नाही.आज तुझ्यावर आलेले संकट हे येथील व्यवस्थेने केलेल्या चुकांचे फळ आहे, तू आत्महत्या केल्याने कुटुंबावर आलेले संकट टळणार आहे का?आजपर्यंत तुझ्यासारख्या लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात,त्यांचे कुटुंबाकडे बघ त्या माऊल्या संघर्ष करीत आहेत.कुणाच्याही आत्महत्यांची सरकारने दखल घेतली आहे का? नाही ना.अरे बाबा तूच असा खचलास तर पुढच्या पिढीला तर नकार ऐकण्याची देखील सवय नाही ,आणि संकट झेलण्याची तर ताकद त्यांच्यात मुळीच नाही?ते कुणाचा आदर्श घेतील. असे शेतकरी पुत्र श्रीकांत गदळे यांनी व्यक्त केले
_देशातील नोकरदार,व्यापारी,मजूर साऱ्यांचा विचार करणारे घटक सरकारात आहेत,नाही ते फक्त शेतकऱ्यांचा विचार करणारे त्याचा वापर फक्त सत्ताकारण साठी करतात.
_देशात साऱ्या सबसिडी बंद झाल्यात पण शेतमाल फुकट वाटणे असो की त्याचे दर पाडणे बंद झाले का?,तर नाही.हेच कारण आहे शेतकरी आत्महत्या वाढण्याचे.मग मार्ग काय? तर जसा पारतंत्र्यात संघर्ष केला तसा आज करा, जाणीव करून द्या सरकारांना.
आपला स्वातंत्र्याचा लढा देखील ९० वर्ष चालला जे आधी लढले त्यांच्या कित्येक पिढ्या संपल्या पुढील पिढ्यांना तो लढा सुरू ठेवावा लागतो तेव्हा स्वातंत्र्य मिळते.येत्या स्वातंत्र्य दिनाच्या काळात तीन दिवस प्रत्येक घरावर तिरंगा अवश्य फडकवा, त्याने तुमच्या मुलांना प्रेरणा मिळेल ते तीन दिवस इंटरनेट वर स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास निश्चित त्याच्या पासून प्रेरणा घ्या.देशातील स्वातंत्र्याचा अभिमान जागृत झाला पाहिजे.देशातील किसान शेतात व त्याची मुल जवान सीमेवर लढत आहेत त्यांना निश्चित वंदन करावे. असे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी प्रसिद्धपत्रका द्वारे म्हटले आहे....