रत्नागिरी : पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 16 ऑक्टोबर 2022 रोजी थेट सरपंच व सदस्य निवडीकरिता होत असून त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने परिवर्तन पॅनेल निवडणूकी रिंगणात असून निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदेवता भराडीन देवीच्या आवारात दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला.

केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळात पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे थेट मिळत आहेत,तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर भाजपा प्रणित पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येऊन सत्ता येणे गरजेचे आहे,तरच गावचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.ते पुढे म्हणाले की राज्यात सत्तेचे परिवर्तन झाल्याने विकासाला वेगळी दिशा मिळाली आहे,राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आपण सर्व मतदारांनी योग्य तो विचार करून भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन,जिल्हा उपाध्यक्ष विजय सलीम,तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे,तालुका सरचिटणीस उमेश कुलकणी,ओमकार फडके , उपाध्यक्ष संजय निवळकर, संकेत कदम, धर्माजी कांबळे(गावकर), हरीचंद्र कांबळे, राजेंद्र कांबळे,(शक्तिकेंद्र प्रमुख),सरपंच पदाचेउमेदवार सौ.राजश्री रामचंद्र काबळे सदस्य पदासाठी चे उमेदवार तानाजी कुळये,राजेंद्र कळबटे , सौ.विनया कांबळे,सौ.संजना कांबळे, सौ.अमृता नेवरेकर, सौ.स्नेहा कुळये,गजानन धनावडे, केशव कुळये,विष्णू कांबळे, मोहन कुळये,रामचंद्र कांबळे,प्रभाकर कांबळे,विनायक कांबळे, भिकाजी कुळये,जगदीश पालशेतकर, सचिन डांगे,शांताराम कांबळे,गोपाळ कांबळे,प्रमोद कांबळे,योगेश कांबळे, जगदीश पालेकर, संदीप उगरे,महेश कुळये,व्यकेटेश नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.