m शिरुर दिनांक (वार्ताहर ) भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्माना ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहरातील पुणे नगर रस्त्यावरील क्रांती चौकातील हुतात्मा समारकावर विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यानी अभिवादन केले . अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन लोकजागृती चळवळीच्या वतीने करण्यात आले होते . यावेळी लोकजागृती चळवळीचे ॲड. .ओमप्रकाश सतीजा , छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक ,माजी नगरसेवक सुकुमार बोरा , मावळाई प्रकाशनचे डॉ. सुभाष गवारी , माजी नगरसेवक मंगेश खांडरे ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,लोकशाही क्रांती आघाडीचे मोहम्मद हुसेन पटेल ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खुशाल बापू गाडे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड .प्रदीप बारवकर , नीलेश खाबिया ,मराठी नाट्य परिषद शिरुर शाखा उपाध्यक्ष प्रा .चंद्रकांत धापटे ,ज्येष्ठ रंगकर्मी दीपक घारु , जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना राळेगण सिध्दी चे माजी सरपंच विलास पोटे ,शिरुर नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक आयुबभाई सय्यद, आखील भारतीय मराठा महासंघाच्या नेत्या शोभना पाचंगे ,समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त योगेश महाजन , राजेंद्र मोरे अनिल चव्हाण , माजी शहराध्यक्ष रमणलाल भंडारी , माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा ,शिरुर नगरपरिषद स्वच्छता आधिकारी दत्तात्रेय बर्गे , विलास गोसावी नीलेश नहार ,सुभाष पाचर्णे ,सुधाकर ओतारी ,गणपतराव लोखंडे ,किसनराव जाधव , प्राचार्य डॉ. समीर ओंकार , शांतीलाल शर्मा ,मनोज अहिरे , विजय गायकवाड ,ॲड. सतीश गवारी ,राहुल बोथरा , ललित खाबिया ,डॉ अतुलकुमार बेंद्रे ,आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्माना स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . शहिद वीर अमर रहे , भारत माता की जय ,वंदे मातरम च्या जयघोष यावेळी करण्यात आला . शिरुर नगरपरिषदेच्या वतीने ही हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी बोलताना रवींद्र धनक म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक जणांनी बलिदान दिले .या बलिदानातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले .हुतात्मा प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे . .बलशाही भारत बनण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी केले . यावेळी सूत्रसंचालन व आभार संजय बारवकर यांनी मानले .