शिरूर दिनांक (वार्ताहर) बाल रंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी यांच्या सयुंक्त विद्यमानाने ‘नटश्रेष्ठ अविनाश देशमुख’ तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन शहरातील ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबूराव नगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १५७ स्पर्धकांनी सहभाग घेत उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. त्यापैकी १८ जणांची जिल्हास्तरीय स्पर्धे करीता निवड झाली आहे.यात ज्ञानगंगा स्कूल मधील सर्वाधिक ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील शिरूर नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक -१, विद्याधाम प्रशाला, ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुरावनगर ,अभिनव विद्यालय सरद्वाडी, जीवन विकास मंदिर शिरूर , व ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल अश्या सहा शाळांनी या स्पर्धेसाठी भाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे पहिला गट (इयत्ता पहिली व दुसरी) – स्वरा नीलेश मुसळे , प्रांजल प्रवीण डांगे, इशाती पंकज कदम, अनुश्री महेश सुरवसे सर्व ( ज्ञानगंगा स्कूल शिरूर ) उत्तेजनार्थ –पावनी श्रीकांत गाडगीळ ( ज्ञानगंगा स्कूल) अभिज्ञा संतोष अडसूळ (विद्याधाम प्रशाला) नक्ष योगेश पाटील (ज्ञानगंगा स्कूल शिरूर) दुसरा गट (इयत्ता तीसरी व चौथी)- श्रावणी मयूर कदम, वेदिका संदीप चिकणे, साई अक्षय वाघचौरे, मित संदीप पाटील, शिवण्णा महेश वराळ उत्तेजनार्थ – आरोही विजय वराळ, हिंदवी रमाकांत शेळके ,आरोही अमोल उधाटे, गट क्रमांक – ३ ( इयत्ता ५ वी ते सातवी ) आराध्या हिंगडे, महादेवी पवार, अवनी शेळके, स्नेहल गोरडे, संतोषी भेंडे, श्रेया सानप, गट क्रमांक -४ आर्या आवारी, ऋतुजा गाडे, वैष्णवी सिदनकर , या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून दिलीप हल्याळ,नितीन महाजन , महेश टिळेकर, अभिजित इनामदार, मंजुषा जोशी, अरुण पटवर्धन, देवेंद्र भिडे व डॉ. सोनाली घाटणेकर यांनी काम पाहिले. दरम्यान स्पर्धेचे बक्षीस वितरण आखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली बाळासाहेब शेळके, ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे संस्थापक डॉ.प्रा.राजेराम घावटे, सचिव सविता घावटे, सीईओ प्रा.डॉ. नितीन घावटे, व्यवसायिक बाळासाहेब शेळके, आखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, चित्रपटनिर्माते डॉ.संतोष पोटे, डॉ.सुनीता पोटे, पत्रकार प्रवीण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ज्ञानगंगा स्कूल प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, मुख्याध्यापिका रुपाली जाधव, मुख्याध्यापक संतोष येवले, पर्यवेक्षिका जयश्री कणसे आदी यावेळी उपस्थित होते. दिपाली शेळके यांनी यावेळी प्रास्ताविक केले. त्यात स्पर्धेचे आयोजन त्याचे स्वरूप याबाबत माहिती दिली. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना त्याच्यातील कलागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगून स्पर्धेसाठी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

फोटो ओळी 

ज्ञानगंगा स्कुल मधील बक्षिस विजेते विद्यार्थी