शिरुर दिनांक ( वार्ताहर )महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी रामदास दरेकर  यांची निवड  झाली आहे .

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रामदास दरेकर यांना  नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे .

दरेकर यांनी यापुर्वी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले  आहे. पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्या पर्यत पोहचविण्या बरोबर  पक्ष बांधणी याबाबत काम करणार असल्याचे दरेकर यांनी निवडी नंतर सांगितले . दरेकर यांनी पक्षाच्या विविध आंदोलनात  सहभाग घेतलेला आहे . त्याच्या पत्नी या पंचायत समितीच्या माजी सदस्या आहेत.