शिक्रापुरात तिसऱ्या मजल्यावरुन पडून युवती ठार

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा जवळील एसएसफोरवन बिल्डींग शेजारील एका तीन मजली बिल्डींगवरुन पडून आरती विजय मन्ने हि पंचवीस वर्षीय युवती ठार झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   

                         शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा जवळील एसएसफोरवन बिल्डींग शेजारी अर्जुन थोरात यांची तीन मजली बिल्डींग असून त्यातील खोल्या भाड्याने दिलेल्या असल्याने सदर बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर एका खोलीमध्ये आरती मन्ने व पूजा कोपटे या दोघी राहत असून आज सकाळच्या सुमारास अचानक आरती जमिनीवर पाडून गंभीर जखमी झाली, यावेळी शेजारील नागरिकांनी तातडीने तिला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी आरती विजय मन्ने वय २५ वर्षे सध्या रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. कोडसी खुर्द ता. कोरपना जि. चंद्रपूर हि युवती मयत झाल्याचे घोषित केले, gघटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता आरती मोबाईल वर बोलत असताना अचानक तोल गेल्याने पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून याबाबत वैशाली चंद्रकांत थोरात वय ३८ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बापू हडागळे हे करत आहे