कर्जबाजारी पणाला कंटाळून युवकाची आत्महत्या

पैठण तालुक्यातील मुरमा धक्कादायक घटना

पाचोड;छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील पंचवीस वर्षीय अविवाहीत युवकाची स्वतःच्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन उमेश कल्याण फटांगडे असे कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेल्या युवकाचे नाव आहे. मुरमा येथील उमेश कल्याण फटांगडे हा वाहनचालक म्हणून पाचोड येथे कामावर होता. त्याचे बालपणी वडीलाचे छत्र हरवल्याने तो व आई शेती व कुटुबियाची जबाबदारी सांभाळत होते. त्यास तीन विवाहीत बहीण असून तो आई वडीलास एकूलता एक होता . तो पाचोड येथे दिवसभराचे काम करून मुरमा या आपल्या गावी आला.साडेसात वाजता तो सर्व मित्रांना भेटला व मी आत्ता शेतातून येतो असे सांगून तो शेतात गेला. बराच वेळ तरी उमेश घरी न आल्याने आईने त्याच्या मित्रांना उमेशला घरी आणण्यासाठी विनंती केलीसमोरील दृश्य पाहुन आईने हंबरडा फोडला. या घटनेची पाचोड पोलिसांना माहीती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदताने मृतदेह खाली घेतला व त्यास पाचोड च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी तपासून मृत घोषित केले.वडीलांच्या निधनानंतर आईने त्याचा सांभाळ करून मोठे केले अन् उमेशने कुणाला काही एक न सांगता आंतिम टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाचोड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पाचोड पोलिस करीत आहे .