शिरुर दिनांक ( वार्ताहर )डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर येथे  शालांतर्गत रिंग खोखो टुर्नामेंट संपन्न झाली

.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय कब्बडी प्रशिक्षक  दत्तात्रय तावरे उपास्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक डॉ समीर ओंकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सामनाची सुरूवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आला. क्रीडा शिक्षक श्री चंद्रकांत झांजे, रत्नमाला महाजन यांनी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न  केले.  अक्षता दिवेकर यांनी आभार मानले.