शिरुर दिनांक ( वार्ताहर ) कृषी उत्त्पन्न बाजार समिती शिरूर ,मेन गेट समोरील होणारी वाहतूक कोंडी कमी करयासाठी मेन गेटच्या समोर बसणा-यान साठी बाजार समितीचा आतील बाजूस जागा देण्याबाबत सूचना करुन त्याप्रमाणे आज पोलीस बंदोबस्त देऊन मेन गेट च्या बाहेर रस्त्यावर कोणालाही बसू न देता शिरूर शहराकडे येणारा रस्ता नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला . दरम्यान पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अनिल ढोकले यांचे शी चर्चा करून बाजार समिती मेन गेट समोर बाजारा साठी बसणारे व्यक्तीसाठी मार्केट यार्ड च्या आत जागा द्याव्या याबत चर्चा करून तो प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या आहेत .त्या प्रमाणे आज शनिवारी पोलीस बंदोबस्त देऊन मेन गेट च्या बाहेर रस्त्यावर कोणालाही बसू न देता शिरूर शहराकडे येणारा रस्ता नागरिकांसाठी मोकळा केला. रस्ता मोकळा करण्यासाठीची कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले,सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण ,पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे ,वीरेंद्र सूम्बे,भाग्यश्री जाधव ,चार होमगार्ड यानी केली .तसेच या पुढे ही मार्केट यार्ड समोर शनिवार आठवडा बाजार च्या दिवशी ट्राफिक जॅम होऊ देणार नाही व शिरूर मधील कोणत्याही रस्त्यावर या पुढे ट्राफिक जॅम होणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यासाठी प्रयत्न करतील l असे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.