शिरुर दिनांक - आमदाबाद ,ता शिरुर येथील  भाविक देवदर्शनासाठी शनि शिंगणापुर व देवगड येथे पाडव्याचा दिवशी गेले होते. देवदर्शन आटोपून घरी परतत असताना भाविक प्रवास करित असलेल्या वाहनास पुणे नगर महामार्गावर कामरगाव जवळ येथे अपघात झाला होता त्यात चार जण ठार झाले होते. तर जखमीवर दवाखान्यात उपचार सुरु होते .

उपचारा दरम्यान समाधान श्रावण साळवे वय १८ यांचे शनिवार दिनांक २५ मार्च रोजी तर ओंकार जालिंधर साळवे वय -१८  दोघे ही राहणार आमदाबाद  यांचे रविवार दिनांक २६ मार्च रोजी निधन झाले .त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या ६ वर पोहोचली आहे .

तर या अपघातात राजेंद्र विष्णु साळवे ,मयुर संतोष साळवे , विजय राजेंद्र अवचिते , धीरज अजित मोहिते सर्व रा आमदाबद , ता शिरुर हे मृत्युमुखी पडले आहेत . या सर्वांच्या निधनाने आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे .