शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेने वाढविलेल्या घर पट्टी व कर आकरणीसंदर्भात ज्या मालमत्ताधारकांनी हरकत घेतल्या होत्या त्या हरकतीवर सुनावणी घेण्यात आली . शिरुर नगरपरिषद कार्यालयात आज नगरविकास खात्याचा वरिष्ठ आधिकारी समोर हरकतीवर सुनावणी घेण्यात आली . यासंदर्भात एकूण ११३९ आक्षेप / हरकती नोंदविण्यात आले होते त्यापैकी प्रत्यक्ष सुनावणीस 774 हजर राहिले . सुनावणीस 365 जण गैरहजर होते अशी माहिती मुख्याधिकारी ॲड .प्रसाद बोरकर व शिरुर नगरपरिषदेचे कर विभागाचे आधिकारी रामचंद्र नरवडे यांनी सांगितले .