सोनवाडीमध्ये जुगार अड्यावर धाड; सहा जुगारी अटकेत..

"पाचोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई"

पाचोड(विजय चिडे)

पैठण तालुक्यातील सोनवाडी येथील टकले यांच्या शेतात जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पाचोड पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले असून ही कारवाई शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली असुन या कारवाईमध्ये दोन लाखांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पाचोड पोलिसांनी जुगाऱ्यांना अटक केली. 

याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सोनवाडी येथील गावात काही जुगारी मोकळ्या जागेवर झन्ना मन्ना नावाचा जुगार पैशावर खेळा जात असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता पाचोड पोलिसांना असता तात्काळ त्या मोकळ्या जागेवर गेले असता तिथे काही लोक जुगार पैशावर खेळत होते. त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला. यामध्ये १) संदिप सुभाष नवले (वय ३१ वर्ष)रा.ईसरवाडी, २) कांताराम दशरथ टकले,(वय ६० वर्ष),3) सोमनाथ अशोक शिंदे (वय 27 वर्ष), 4)नसिर हमीद पठाण (वय 35 वर्ष), 5)भारत रामनाथ नवले (वय 31 वर्ष), 6) तोफीक कदिर शेख (वय 23 वर्ष) हे सर्व जणं रा.सोनवाडी ता. पैठण यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम व इतर चीजवस्तू असा एकुण दोन रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष माने,फिरोज बर्डे, रवींद्र आंबेकर, अफसर बागवान यांनी केली असून झन्ना मन्ना खेळणाऱ्या सहा ही जणांवर पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पवन चव्हाण करीत आहे.