शिरुर दिनांक ( वार्ताहर ) गृहनिर्माण सोसायटी मतदार अभियानात सहभागी व्हवे असे आवाहन मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर यांनी केले . भारत निवडणूक आयोगाने दि.१/१/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. मतदारांचा एकूण सहभाग वाढविण्यासाठी लक्षित प्रयत्नासह विविध माध्यामाद्वारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणिय वाढ करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात साधारण पणे २०९३६ इतक्या गृहनिर्माण सोसायटी नोंदणीकृत आहेत. सदर सोसायट्यां मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार वास्तव्यास असून त्यांची १०० % मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. सोसायटी मधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदार यादी मध्ये व्हावी यासाठी शासनाने गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान राबविण्याचे ठरविले आहे ..त्या अनुषंगाने याबाबत शहरातील राजकीय पक्ष व माध्यम प्रतिनिधी यांची बैठक शिरुर नगरपरिषद स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती. यावेळी कार्यालयीन अधीक्षक अय्युबभाई सय्यद ,कॉग्रेस आय चे शहराध्यक्ष ॲड किरण आंबेकर , शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड सुभाष पवार , मनसेचे उपजिल्हाप्रमुख महिबूब सय्यद , आपचे पदाधिकारी ॲड सुभाष जैन , शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रवीण चोरडिया , लोकशाही क्रांती आघाडीचे मोहम्मद पटेल , बहुजन समाज पक्षाचे फिरोज सय्यद ,मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना मुख्याधिकरी ॲड बोरकर यांनी सांगितले की निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दि. ०१ जानेवारी २०२४ या अहर्ता दिनांकावर मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननि रीक्षण कार्यक्रम दि. ०१ जानेवारी २०२३ ते दि. १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत निर्धारीत केलेला आहे. त्यानुसार शिरूर शहरातील सर्व शहरवासीयांना नवीन मतदार नोंदणी, वगळणी, स्थानांतर, मतदारांच्या तपशीलातील दुरुस्ती करणे आणि नवीन ओळखपत्र या साठीचे फॉर्म हे जवळील गृहनिर्माण सोसायटी मध्ये कॅम्प चे आयोजन केलेल्या ठिकाणी स्विकारले जाणार आहेत. नवीन मतदार नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६. वगळणीसाठी नमुना क्रमांक ७, आणि स्थानांतर, मतदारांचा तपशील दुरुस्ती व दुबार ओळखपत्रासाठी नमुना क्र. ८ गृहनिर्माण सोसायटी मध्ये कॅम्प चे आयोजन केलेल्या ठिकाणी स्विकारले जाणार आहेत. प्रत्येक कॅम्पच्या ठिकाणी बी.एल.ओ. व इतर अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे. यामध्ये मयत मतदार, दुबार मतदार, विवाह किंवा कायम स्वरूपी स्थलांतरीत मतदारांच्या वगळणीसाठीचे फॉर्म भरावयाचे आहेत. तसेच नावात दुरुस्ती नव मतदारांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे . ८० वर्षावरील मतदार यांची माहिती घेणे, तसेच छायाचित्र कृष्णधवल अथवा अस्पष्ट छायाचित्र असलेल्या मतदारांची पडताळणी करणे आवश्यक तेथे नमुना क्र. ८ व नमुना क्र. ७ भरावेत. आपल्या भागातील मतदार यादीमधील नोंदी व्यवस्थीत आहेत की नाहीत, याची खात्री सर्व मतदारांनी करून घ्यावी, असे'आवाहन बोरकर यांनी केले . दि. २२ व २३ जुलै २०२३ रोजी आपल्या जवळील कॅम्प च्या ठिकाणी भेट देऊन आपली मतदार नोंदणी व इतर आनुषंगिक कामे करून घ्यावी असे ही बोरकर म्हणाले .