नाथसागर धरणाचे आठरा दरवाजे अर्धा फूट उघडले..
पैठण : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे सोमवारी दुपारी २७ पैकी दहा दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले होते. परंतु सोमवारी रात्री एकच्या दरम्यान वरील धरणातून पाण्याची आवक वाढल्यामुळे नाथसागर धरणाचे पुन्हा आठ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले. हा निर्णय शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला.सोमवारी रात्री आठ दरवाजे अर्धा फूट उघडून एकूण १८ दरवाजातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी धरणाच्या दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक, जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९क्युसेक, व उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक असे एकूण ११ हजार ६२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. मंगळवारी नियंत्रण कक्षात नोंद केल्यानुसार धरणात ९४.६६ टक्के पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा २७९३.२१२ दशलक्षघनमीटर आहे.