शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील सिताबाई थिटे डी फार्मसी महाविद्यालयास उत्तम श्रेणी प्रदान* महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने श्री .छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी  शिरूर महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष 2022 -23 मध्ये उत्तम श्रेणी प्रदान करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी दिली.

    संस्थापक अध्यक्ष  माजी गृहराज्यमंत्री  कै. बापूसाहेब थिटे यांचे प्रेरणेतून स्थापन झालेल्या श्री .छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली) शिरूर महाविद्यालयाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवीन दिल्ली या सर्वोच्च केंद्रीय संस्थेचे व तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांची मान्यता आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळच्या शैक्षणिक देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास भेट देऊन शैक्षणिक कामकाज ,पायाभूत सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा ,संगणक कक्ष, महाविद्यालयाचा निकाल, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले  उपक्रम, शिक्षक वर्ग ,मुलींचे वस्तीगृह यांची पाहणी व छाननी करून सीताबाई थिटे महाविद्यालयस सन  2022 - 23 या शैक्षणिक वर्षासाठी उत्तम श्रेणी प्रदान करण्यात आली आहे .या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे, सचिव, धनंजय थिटे, संचालक डॉ. हर्षवर्धन थिटे व सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांचे मोठे योगदान असल्याचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी सांगितले