शिरुर दिनांक (वार्ताहर ) वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच परिसरातील सडक सख्याहरी विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले . शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांची सोलापूर येथे बदली झाली असुन त्याच्या जागी नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी आज माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला . यावेळी  पोलीस कर्मचारी राजेंद्र गोपाळे उपस्थित होते .

यावेळी  संवाद साधताना  जगताप म्हणाले की शिरुर हे पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे महत्वाचे शहर असुन शिरुर ही एक मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे मोठी नागरिकांची वर्द्ळ असते त्याच बरोबर शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या प्र्माणावर विद्यार्थी विद्यार्थिनी शहरात येत असतात शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थ्याना सुरक्षित वातावरणात शिक्षणात शिक्षण घेता यावे यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील . त्याच बरोबर वाहतुकीला शिस्त लावण्या बरोबरच अवैध धंदावरही कारवाई करण्यात येणार आहे परिसरारील सडक सख्याहरी व छेड छाडी करण्यारा धडक कारवाई सातत्याने करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले .