वाघोलीत शिरूर लोकसभा प्रवास योजना युवा संवाद संपन्न

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांची उपस्थिती.

वाघोली/ प्रतिनिधी 

नितीन शिंदे

विकासात्मक निती असलेले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या ध्येय धोरणानुसार काम करून समजाला बरोबर घेऊन देश प्रगती पथावर नेवूया. सोशल मिडीयाचे संघटन व कामकाजावर जोर देवून जनमानसात पोहचूया, आणि शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचे कमल फुलवु पाहुया असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री रेणुका सिंह यांनी केले.

   शिरूर लोकसभा प्रवास योजना

वाघोली येथील सीजन २४ बेनीक्विट् येथे शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी आयटी,सोशल मिडीया प्रकोष्ठ, युवामोर्चा पदाधिकारी यांचेशी संवाद साधनण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते .

    यावेळी गणेश भेगडे पुणे जिल्हा अध्यक्ष भाजपा, आ.माधुरी मिसाळ, धर्मेंद्र खांडरे पुणे जि. सरचिटणीस ,प्रदीप कंद मा. जि.प.अध्यक्ष, गणेश कुटे युवा मोर्चा महा. प्रदेशसचिव,संदीप सातव युवा मोर्चा जिल्हा संघटक, गणेश सातव,प्रविन सातव, प्रदीप सातव, रत्नमाला सातव,निलेश सातव, ऋषिकेश दाभाडे भाजप वाघोली शहर सरचिटणीस यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.