त्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू 

"पाचोड-पैठण महामार्गावरील आखतवाडा फाटा फाट्यावरील घटना"

पाचोड विजय चिडे 

- पैठण-पाचोड राज्य मार्गावरील आखतवाडा फाटा येथे आठ दिवसापूर्वी एक स्कार्पिओ गाडी पुलाच्या कठड्याला आढळ्याने अपघात होऊन एक जण जागी ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती, त्याचं अपघातातील खेर्डा तांडा येथील गणेश बाबुराव जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार,

नानेगाव व खर्डा तांडा येथील राहुल बापूराव केसभट ,गणेश बाबुराव जाधव, नानेगाव येथील सरपंच अनिल बोधने, ग्रामपंचायत सदस्य कैलास शंकर जाधव ,श्रीराम कल्याण बोधणे, बद्री नाहणू जाधव,हे सर्व जणं भरधाव वेगाने स्कार्पिओ गाडी घेऊन पैठण शहराकडे जात असताना चालकाचे स्कार्पिओ गाडी नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कडठ्यास धडकून पलटी झाली. स्कार्पिओ चा वेग जास्त असल्याने गाडीने तीन पलट्या घेतल्या.मात्र या अपघातात राहूल केसभट याचा जागीच मृत्यू झाला तर स्कार्पिओच्या ऐअरबँग उघडल्याने गाडी मधील पाच जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता.पंरतु यातील गणेश बाबुराव जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.