शिरुर दिनांक (वार्ताहर ) आंतरजिल्हा जबरी चोरी करणारे टोळीचे म्होरक्यास पोलीसांनी जेरबंद केले असुन १८ गुन्हे उघडकीस आणले आले आहेत .त्याच्याकडुन २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग व एकांटी वस्तीमध्ये दरोडयांचे व जबरी चोरीचे तसेच घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते . हे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना सुचना दिल्या होत्या .त्यानुसार त्यांनी ६ ते ७ पथके तयार करून वेगवेगळया ठिकाणी रवाना केलेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तयार केलेल्या पथकामार्फत समांतर तपास करीत असताना सी. सी. टी. व्ही. फुटेजचे आधारे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीचा आधारे यापूर्वी अजय उल्हास्था काळे, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले हेते .त्याचेकडे केलेल्या तपासातून व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीवरून गणेश सुरेश भोसले वय २८ वर्षे रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात चोरीस गेलेल्या दागिना पैकी ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक बदाम, चोरलेली यूनिकॉर्न गाडी, घडयाळ, ब्रेसलेट असा ऐवज मिळून आला तसेच त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने वेळोवेळी दरोडे, जबरी चोरी व घरफोडी चोरी करून चोरलेले सोन्याचे दागिने हे किरण भाऊसाहेब बेद्रे या सराफास विक्री केल्याची माहीती सांगितली . त्यावरून किरण भाऊसाहेब बेंद्रे, वय ३३ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. मु.पो. वाळुंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेले मालापैकी २९४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण रू. १७,६४,०००/- किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान १) अजय उल्हास्या काळे, रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर, २) गणेश सुरेश भोसले वय २८ वर्षे रा. वाळुंज, ता. आष्टी पारनेर, जि बीड, सध्या रा. शंभु डोंगर, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ३) पावल्या ऊर्फ देवा कैलास काळे, ४) तुषार ऊर्फ विशाल कैलास काळे, ५) शरद कैलास काळे सर्व रा. कडुस, ता. पारनेर, जि. अहमदनगर यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चोरलेले सोने हे किरण भाऊसाहेब बेंद्रे, वय ३३ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. मु.पो. वाळुंज, ता. नगर, जि. अहमदनगर यास विक्री केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गुन्हयातील आरोपींना न्यायालयाने दिनांक १५/०७/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. या आरोपीनी आळेफाटा ,शिक्रापुर , शिरुर , रांजणगाव , नारायणगाव दौड,बेलवंडी ,पारनेर या पोलीस ठाण्यातील हद्दीत केलेले १८ गुन्हे उघडकीस आले आहेत . हा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक .पोलीस .निरीक्षक नेताजी गंधारे, महादेव शेलार, पोलीस सबइन्सपेक्टर गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमित सिद-पाटील, प्रदिप चौधरी, शिवाजी ननवरे, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, शब्बीर पठाण, हनुमंत पासलकर, प्रकाश वाघमारे, विनोद भोकरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, राजु मोमीन, दिपक साबळे, जनार्दन शेळके, मंगेश थिगळे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अजय घुले, हेमंत विरोळे, विजय कांचन, विक्रमसिंह तापकीर, दत्ता तांबे, महेश बनकर, ज्ञानदेव क्षिरसागर, रामदास बाबर, निलेश शिंदे, चंद्रकांत जाधव, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, पोलीस नाईक बाळासाहेब खडके, धिरज जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, निलेश सुपेकर, प्राण येवले, मंगेश भगत, सहाय्यक फौजदार काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, पोलीस कॉन्स्टेबल दगडु विरकर, अक्षय सुपे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, निखील रावडे, श्रीमंत होनमाने यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायाक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करीत आहेत.