शिरुर (वार्ताहर   ) रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा कामगाराचा १० महिन्याचा थकित पगार मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकरिता घोडगंगा कारखान्याचा कामगारानी शिरुर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला . मोर्चात मोठ्या संख्येने कामगार वर्ग सहभागी झाला होता . बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मोर्चास सुरुवात झाली. शिरुर बसस्थानक ,विद्याधाम प्रशाला असा जुन्या पुणे नगर रस्त्याने हा मोर्चा गेला . यावेळी कामगार नेते महादेव मचाले , तात्यासाहेब शेलार , नानासाहेब मासाळ , दत्तात्रेय लोंढे ,शिवाजी शेंडगे , शिवाजी कोहोकडे , रवी रणदिवे , मारुती नागवडे , कॉग्रेस आयचे नेते महेश ढमढेरे ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , शिरुर शहर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे ,शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे गणेश जामदार आदी उपस्थित होते . तहसिल कार्यालय समोर झालेल्या सभेचे प्रास्ताविक कामगार नेते महादेव मचाले यांनी केले त्यात ते म्हणाले की घोडगंगा कारखाना हा तालुक्याच्या विकासाची कामधेनू आहे. .लोकशाही मार्गाने आमच्या मागण्यासाठी संघर्ष करीत आहे .१० महिने होवून ही कामगाराना पगार नाही . कामगारांचे थकित २५ कोटी रुपये कामगारांचे मिळावेत या व अन्य मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही . नायब तहसिलदार सुवर्णा खरमाटे यांच्या कडे मागण्याचे निवेदन देण्यात आले . निवेदनात म्हटले आहे की त्रिपक्षीय समितीच्या करारातील ३३ महिन्याचा १२ % वेतनवाढीचा फरक मिळावा , संप्टेंबर २०२२ ते जून २०२३ अखेरील १० महिन्याचा थकित पगार मिळावा , प्रॉव्हिडंड फंड माहे नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ अखेरील थकित रक्कम मिळावी , कामगार सोसायटीची एक वर्षा पासून कपात केलेली थकीत रक्कम मिळावी , कर्मचारी विमा कपातीची रक्क्म त्वरित भरण्यात यावी रोजंदारी कर्माचा-यांचे थकित पगार रक्कम मिळावी , मयत कर्मचा-यांचा वारसाना पगारातून कपात केलेली मदतनिधी रक्कम मिळावी . कर्मचा-याची २५ कोटी रक्कमेची देणी कारखान्याने अद्याप पर्यत दिलेली नाहीत ते मिळावे अश्या मागण्या करण्यात आला . यावेळी महेश ढमढेरे , संजय बारवकर , गणेश जामदार , अनिल बांडे यांची भाषणे झाली . फोटो ओळी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा कामगाराचा १० महिन्याचा थकित पगार मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकरिता कामगाराच्या मोर्चा शिरुर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला