शिरुर दिनांक ( वार्ताहर ) सध्याच्या राजकिय घडामोडीवर मनसे च्या वतीने संतापाची एक सही व लोकांचे मत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने हुतात्मा स्मारक शिरुर येथे सहीची मोहीम हा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे , ॲड आदित्य मैड ,रवींद्र लेंडे ,बंडु दुधाने ,शारदा भुजबळ , रवींद्र गुळादे , माजी शहरप्रमुख अविनाश घोगरे ,आदी उपस्थित होते . महिबूब सय्यद म्हणाले की सध्या राज्यात ज्या काही राजकिय घडामोडी होत आहे . त्यामुळे सामान्य जनतेत संताप व्यक्त केला जात आहे राज्या समोर अनेक प्रश्न समस्या उभ्या आहेत त्यावर काम करणे आवश्यक आहे . सद्य राजकीय स्थिती वर असणारा संताप व्यक्त करण्यासाठी एक सही संतापाची हा कार्यक्रम अयोजित करण्यात आला असुन शहरातील विविध भागात तो करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले . फोटो ओळी सध्याच्या राजकिय घडामोडीवर मनसे च्या वतीने संतापाची एक सही व लोकांचे मत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने हुतात्मा स्मारक शिरुर येथे सहीची मोहीम हा कार्यक्रम घेण्यात आला .