कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
" ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार " या घोषवाक्याने उदयास आलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रणेते शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 35 वी पुण्यतिथी कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रम राबवित साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यालयापासून कोरेगाव भीमा गावातून शिस्तबद्ध प्रभातफेरी काढत शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तर विद्यालयाच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद व डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्थानिक सल्लागार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र फडतरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगत आपण विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने स्वतःवर देखील विद्यालयातील शिक्षणाचा प्रभाव असल्याचे सांगितले. तर माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी उत्कृष्ठ प्रकारच्या शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य माणिक कुंभारकर यांनी विद्यालयात शिक्षणाचे बरोबरच विद्यार्थ्यांनसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मान्यवरांना देत शाळेसाठीL सर्वांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. यांचे बरोबरच रमेश गावडे यांनी शिक्षक मनोगत तर विद्यार्थी मनोगत संघमित्रा सुरवाडे हिने व्यक्त केले.
यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे संचालक महादेव फडतरे, बबूशा ढेरंगे, बापूसाहेब शिंदे यांचे सह अरुण सव्वाशे, ग्रामपंचायत सदस्या सदस्य जयश्री गव्हाणे, वंदना गव्हाणे, एव्हर इलेक्ट्रॉनिक कंपनीचे प्रमुख नंबुरी सर, मिलिंद अंबेकर आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विद्यालयाचे शिक्षक राजाभाऊ कदम, प्रवीण भुरे, शरयू कांबळे, वर्षा परीट, वर्षा वाजे, दत्तात्रय कोणे, संभाजी कोल्हे, गुलाब बहिरम, विजय देशमुख, मनीषा अंकुशराव, वैशाली काळभोर, किशोर गव्हाणे, नागेश गाडेकर, अनिल गव्हाणे, करण कुटेमाटे, प्रा. हनुमंत मुंडे, प्रा. शुभांगी गायकवाड, प्रा. महादेव केंद्रे यांनी केले. प्रभातफेरीसाठी ट्रॅक्टर व्यवस्था गणेश गव्हाणे यांनी तर सूत्रसंचालन पुष्पलता गिरी, स्वागत भगवान बेल्हेकर तसेच आभार मारुती धुमाळे यांनी मानले.