हिंगोली जिल्ह्यात बोगस खते, बोगस बियाणे , बोगस जैविक औषधे विक्री केली जात असुन याच्या विरोधात अनेकवेळा स्वाभिमानी संघटनेने आवाज उठवुन कारवाई न झाल्याने आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक पुतळा फुकला...

 कृषिमंत्री तथा हिंगोली जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जवाबदारी असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या हिंगोली जिल्यात खुले आम बोगस खते, बोगस बियाणे , बोगस जैविक औषधी विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे या विषयी अनेकवेळा स्वाभिमानी संघटनेने आवाज उठवला तरी यावर कृषी विभागाकडून कारवाई केली नसल्याने हिंगोलीत स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली असुन आज गोरेगाव येथील जिजाऊ चौकात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन विरोधात घोषणाबाजी करण्यात आली‌ या मध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.