औंरगाबाद: दि. 8 ऑगस्ट (दीपक परेराव) : शिवसेना विधानपरिषद सदस्यांची बैठक "मातोश्री" येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती.

या बैठकीत विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार मा.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रदान करण्यात आले.विधानपरिषद सभागृहात शिवसेनेची सदस्य संख्या जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी अंबादास एकनाथराव दानवे यांना विधानपरिषद विरोधी पक्षनेता म्हणून  नियुक्त करावे करिता त्यांच्या नावाची शिफारस करत आहे. असे शिफारस पत्राच्या माध्यमातून सभापतींना केला.

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते मिळावं यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, मनीषा कायंदे इच्छुक होत्या. अंबादास दानवे यांचा आक्रमक स्वभाव आणि निर्भीड, पत्रकारिता पदवीधर,संभाषण भाषणकला, जनसंपर्क अभ्यास, जनतेचे प्रश्न असलेला नेता ,तसेच त्यांचं विधान परिषदेतील काम लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली आहे. दुसरीकडे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेच ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. तसेच दानवेंना विरोधी पक्षनेते पद देऊन उद्धव ठाकरेंनी ‘संबंधितांना’ एक प्रकारे करारा जबाब दिला आहे. मराठवाड्यातील नव्या दमाच्या नेत्याला संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी दानवेच योग्य असा शिवसेनेचा दावा.