'हर घर तिरंगा' मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हा..

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आवाहन..

गडचिरोली:- भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे.जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' मोहिम राबविण्यात येत आहे. या या मोहिमेत गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे.प्रशासनातर्फे 'हर घर तिरंगा' मोहीम राबविण्याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहे. गडचिरोली जिल्हयात ग्रामीण २.३८ लक्ष व नागरी ६० हजार असे मिळून २.९८ लक्ष घरांमधे तिरंगा उभारण्याचे उद्दीष्ट प्रशासनाकडून ठरविण्यात आले आहे. प्रशासनाकडून आवश्यक ध्वज जिल्हयात उपलब्ध करण्यात आले आहेत. नागरिकांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत, शाळा तर शहरी भागात नगरपंचायत कार्यालयात ध्वज उपलब्ध होणार आहेत. नागरिकांना हर घर तिरंगा बाबतही माहिती विविध स्तरावर देण्यात येत आहे. प्रसिद्धी कार्यक्रमांमधे सर्व गावांमधे व शहरांमधे प्रभातफेऱ्या, बॅनर, पोस्टर, हॅण्डबील, ध्वनीक्षेपक सयंत्र, भित्तीचित्रे, पथनाट्य व प्रसार माध्यमांच्या वापरातून जनजागृती करण्यात येत आहे. या पार्शवभूमीवर नागरिकांनी 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभाग दर्शवून आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले आहे..