काळेबोराटेनगरमधील म्हसोबानगर रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे उंड्री, ता. 14 ः काळेबोराटेनगर येथील म्हसोबानगर रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. वारंवार पालिका प्रशासनाकडे रस्ते दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे शाळकरी विद्यार्थी, स्कूल बस, नोकरदार, व्यावसायिकांना चिखल, खड्डेमय आणि पाण्याच्या डबक्यातून प्रवास करावा लागत आहे. पालिकेमध्ये गावे समाविष्ट करून या सुविधा दिल्या का, त्यासाठी आम्ही वाढीव कर भरायचा का, असा संतप्त सवाल परिसरातील समस्त महिलांच्या वतीने हर्षदा वरुदे यांनी उपस्थित केला.