शिरूर तालुका शिवसेना ज्येष्ठ मार्गदर्शकपदी बाजीराव चौधरी यांची निवड

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

 शिवसेना शिंदे गटाच्या शिरूर तालुका ज्येष्ठ मार्गदर्शकपदी बाजीराव सयाभाऊ चौधरी यांची नुकतीच निवड करण्यात आली असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे आदी सर्वानुमते बाजीराव चौधरी यांची 'शिवसेना ज्येष्ठ मार्गदर्शक' पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला. यापुढील काळात शिवसेना पक्षाच्या ध्येय-धोरणांवर लक्ष ठेवून प्रामाणिकपणे काम करत पक्ष बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.