शेतकऱ्यांनी फवारणी करतांना काळजी घ्यावे-कृषी अधिकारी विकास पाटील

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाचोड;पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी कशापध्दतीने करावी यासाठी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी (दि.८)रोजी शेतकरी मेळवा घेऊन मार्गदर्शन केले असून फवारणी कीट शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षाची लागवड करण्यात आली. या मेळव्यात मार्गदर्शन करतांना पाटील यांनी असे म्हटले की, खरीप हंगामात कपाशी व सोयाबीनचे उत्पन्न घरात येण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच किडीचे आक्रमण होत असल्याने त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधांची फवारणी करीत आहेत तसेच मिक्‍स औषध फवारले जात असल्याने शेतकरी बाधित होत असल्याने शेतकऱ्यांनी फवारणी तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करताना, फवारणी करिता शेतकऱ्यांनी शुद्ध पाण्याचा वापर करणे आवश्‍यक आहे. औषध फवारणी वेळी शेतकऱ्यांनी तोंडावर ‌मास्क, डोळ्यावर गॉगल तसेच हातात हातमोजे घालूनच फवारणी करावी, असे मार्गदर्शन केले आहे.यावेळी पं.स.तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,संतोष ढेरे,भगवान बढे,सिध्देश्वर टेकाळे,भगवान कृषी केंद्र चालक ज्ञानदेव बढे,सुधाकर थोरे,संतोष वाघमारे,पंढरिनाथ थोरे,मंच्छिद्र थोरेसह आदी शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.