५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 14 जून जागतिक रक्तदान दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सेनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा हिंगोली स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना गोरेगाव जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 जून शुक्रवार रोजी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुनाल यांच्या हस्ते करण्यात आले सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त रक्ताचा तुटवडा जाणत असून दिनांक 14 जून जागतिक रक्त दिनाचे औचित्य साधून गोरेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रुणवाल यांनी उपस्थित सर्वांना तसेच नवतरुणांनी वर्षभरातून एकदा तरी रक्तदान करावे रक्तदान पेक्षा मोठ कोणतंही दान नसुन रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होत नाही तर पुन्हा रक्त शरीरात तयार होते अशी माहिती दिली.

यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा हिंगोली चे अध्यक्ष रामदास कावरखे सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गिरी सर, डॉ शिंदे मॅडम, डॉ वसंत पाटील सर, डॉ दिपक खिलारी सर व खीलारी मित्र मंडळ तालुका आरोग्य पर्यवेक्षक अशोक जोशी सर, मारोतराव पोले, cho, डॉ महादेव वानखेडे, डॉ अजय जाधव, डॉ हनुमान सावके, डॉ. बोरकर, डॉ स्वाती मगर, डॉ दिपाली इंगोले, डॉ गौरव जाणूनकर, डॉ विजय इंगळे माणिक सीताफळे सर, राजु गोटे सर आरोग्य सहाय्यक श्री चौधरी, रविंद्र बंगार, सुभाष दिपके, अमोल कांबळे, श्री शिंदे, रामप्रसाद मते, श्री जोगदंड, गणेश चोपडे, लक्ष्मण कोळेकर, बालासाहेब कांबळे मिलिंद पडघन, गणेश पुरी, श्री झाडे, नामदेव भिसे, शेख, शांतीप्रसाद श्री तिवारी राहुल वाकोडे, वैभव कांबळे श्रीमती जाधव, श्रीमती वानखेडे श्रीमती सोनटक्के, सुकेशनी धाबे, श्रीमती लाखे, सुकेशनी सोनवणे, श्रीमती गांधिले श्रीमती ढोरे गटप्रवर्तक श्रीमती धामणे, श्रीमती मोरे, श्रीमती शेळके, वाहन चालक राजू बनकर श्री काकडे, वैभव खंदारे आरोग्य कर्मचारी शिक्षक व आशा वर्कर यांची उपस्थिती होती.या शिबिरात रक्त संकलन करण्याचे काम श्री नरवाडे, नितीन शेंडगे, विद्या तोर, सुमित मगर, वैजनाथ गायकवाड यांनी केले. तर संघटनेचे सर्व पदाधिकारी, गोरेगाव चे सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, cho यांनी सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.