शिरुर दिनांक ( वार्ताहर  ) बंधा-यावरील लोखंडी ढापेची दरोडा घालून चोरी करणारी टोळी शिरुर पोलीसांनी जेरबंद केली . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जून २०२३ रोजी मध्य रात्री ०२.३०वा सुमारास वडनेर खुर्द, ता. शिरूर जि. पुणे येथील नाथा शंकर निचीत यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक थेऊरकर यांना फोनद्वारे "त्यांचे राहते घराजवळ ठेवलेले बंधा-याचे ६२ लोखडी ढापे हे ५ आरोपीनी चाकुचा धाक दाखवुन बळजरीने दरोडा घालून आयशर टेम्पो व पिकअप वाहनातून चोरी करून नेले आहे" असे कळविले नंतर चोरीस गेलेले लोखंडी ढापे व त्यांचेकडील आयशर टेम्पो व पिकअप जिपचा शोध घेत असताना पोलीस पथक पंचतळे ते जांबुत रोडने वडनेर खुर्द कडे येत असताना पोलीसांना पाहुन चोरटयांनी आयशर कंपनीचा टेम्पो जांबुत गावचे हददीत ब्रिटानिया डेअरीसमोर उभा केला तेव्हा त्यामधील ३ चोरटे पळून गेले त्यावेळी पोलीसांनी व ग्रामस्थांनी मिळुन आयशर टेम्पोचा डायव्हर गोरक्षनाथ अंबादास गोंड रा. सिन्नर जि.नाशिक यास शिताफीने पकडले. तेंव्हा त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये ४९ लोखंडी ढापे मिळून आले. आयशर टेम्पो डायव्हरकडे पळून गेलेल्या त्याचे साथीदारांबाबत विचारपुस करून त्याचे कडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे वडनेर- जांबुत पंचतळे रोडने पोलीस पथक, पोलीस मित्र व ग्रामस्थांनी सदर पिकअप जिपचा पाठलाग करून पिकअप जिप ही जांबुत ब्रिटानिया डेअरीपासून १ कि.मी. अंतरावर वडनेर- जांबुत-पंचतळे रोडला पकडली. पिकअप ड्रायव्हर पोलीसांनी ताब्यात घेतला. त्याचे पिकअप जिपची मध्ये एकुण १३ लोखंडी ढापे मिळुन आले आहेत. असे एकुण ६२ ढापे आयशर टेम्पो नं. एम.एच.१५ डी.के. ०५४५ व पिकअप जीप नं. एम.एच.१४ जे. एल. २९१५ यामधुन जप्त करण्यात आलेले आहेत. सदर प्रकरणातील पळुन गेलेले आरोपीचा पोलीस अधीक्षक अंकित गोयल. अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिरूर उपविभागआधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली टाकळीहाजी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलीस पथकाने शोध घेवून सिन्नर, नाशिक येथुन सापळा लावुन जेरबंद करण्यात आले. जेरबंद केलेल्या मध्ये १) गोरक्षनाथ अंबादास गोंडे रा. पाटपिंपरी ता.सिन्नर जि.नाशिक (आयशर टेम्पो डायव्हर) २)संजय यादव ३) प्रकाश धोंडीबा गावडे रा. दुगाव, ता. आंबेगाव जि.पुणे (पिकअप डायव्हर) ४) अजयकुमार दुखी मौर्य रा.अटॉप ऑफ हिल, मुंबई सध्या रा. सिन्नर, ता. सिन्नर, जि.नाशिक ५) विरेंद्रकुमार केसरीप्रसाद सोनी सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक यांना अटक करण्यात आली असून आरोपींकडुन दरोडा टाकुन चोरी केलेले एकुण ६२ लोखंडी या कि. ५,२७,००० रु व वरीलप्रमाणे गुन्हा करण्याकरीता वापरलेला आयशर टेम्पो कि.रू.. ८,००,०००/- लाख किमतीचा व पिकअप जिप ५,००,०००/- लाख रूपये किमतीची असा एकुण १८,२७,०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीना दि.२० जुन २०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असुन पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करीत आहेत.