शिरुर दिनांक ( वार्ताहर ) आपल्या आयुष्यात यश मिळवायचे असेल तर ; आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला प्रयत्नांची,मार्गदर्शनाची ,जिद्दीची ,ध्येयपूर्तीची तसेच पाठिंबा किंवा प्रेरणेची जोड असेल तरच यश साध्य होते.मार्गदर्शन व प्रेरणेचे आणि स्वकष्टांचे सातत्य असल्यामुळे कितीही कठीण गोष्टी सुलभ होतात याची प्रचिती मला दहावीच्या परीक्षाअंती आली असे येथील रसिकलाल  माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविलेला सार्थक महाजन याने व्यक्त केले .

नुकत्याच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला .शिरुरचा रसिकलाल माणिकचंद धारिवाल ( आरएमडी ) स्कूल मध्ये  सार्थक महाजन यांच्या द्वितीय क्रमांक आला .

महाजन याने सांगितले की घरातील शैक्षणिक वातावरण व संस्कार  तसेच शाळेतील शिक्षकांचे , क्लासचे उत्तम मार्गदर्शन व शिकवण्याची हातोटी,समोरील विद्यार्थ्यांचे सोप्या भाषेत केलेले शंकांचे निरसन या गोष्टीही  महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मला परीक्षेत भरघोस यश मिळाले.मला शाळेतील अध्यापना सोबत घरातील माझी आई, वडील, आजी, पणजोबा यांचा देखील शैक्षणिक वारसा लाभला. सर्व घरातील शिक्षकच असल्याने शैक्षणिक वातावरणाची त्याला जोड मिळाली आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला आणि यशाच्या प्राप्तीसाठी या सर्व गोष्टी याला कारणीभूत आहेत. प्रामाणिकपणे केलेले कष्ट, मेहनत, सातत्य हेही मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. परीक्षेची भीती मनातून गेली आणि आत्मविश्वास आला म्हणूनच सर्व वंदनीय गुरुजन व आप्तेष्ट यांचे  मनापासून खूप खूप आभार . म्हणतात ना , "प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे" अशा प्रकारे "माझा यशाचा झोका अलगदपणे उंच गेला"  अशी भावना सार्थक याने व्यक्त केली .