पाथरी(वार्ताहर)तालुक्यातील हादगाव बु येथे नखाते परिवारातील सदस्यांच्या सहभागातून विठोबा महाराज मंदीर जिर्णोध्दाराचे काम पुर्ण झाले आहे.यानिमित्त २९ आँगष्ट रोजी आयोजित कार्यक्रमात स्वामी मनिषानंद महाराज पुरी यांचे हस्ते विठ्ठल रुक्मीणी मुर्ती प्राण प्रतिष्ठा व कलश रोहन करण्यात येणार आहे.अशी माहिती पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी दिली आहे.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

       हादगांव बु येथे नखाते परिवाराच्या वतीने येथील विठोबा महाराज मंदिर जिर्णोध्दाराचे काम अवघ्या दिड महिन्यात पुर्ण केले.यानिमित्त २९ आँगष्ट रोजी सकाळी ११ वा. ह.भ.प. महामंडलेश्वर १००८ स्वामी मणिषानंद महाराज पुरी रूढी यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुख्मीणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहण होणार असुन ११ ते १ या वेळेत किर्तन होणार आहे.

       भाविकभक्तांनी किर्तन श्रवण व महाप्रसादास उपस्थित रहावे असे आवाहन नखाते परिवार व ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.

 ▪️विठोबा महाराज एक अद्भूतशक्ती...

           विठोबा महाराज यांची आख्यायिका सांगताना पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी सांगितले की,८० वर्षापूर्वी विठोबा नावाचे गृहस्थ हादगांव बु येथे येऊन वास्तवास राहू लागले.त्यानंतर ते विठोबा महाराज म्हणून सुपरिचित झाले. या वेळी सुखदेवराव नखाते यांचा विठोबा महाराज बरोबर सहवास वाढला.एकेदिवशी सुखदेवराव नखाते यांनी संतती होत नसल्याची खंत विठोबा महाराज यांचेकडे व्यक्त केली.विठोबा महाराज यांनी एक वर्षात संतती होईल असा आशिर्वाद दिला.आणि सुखदेवराव यांना मुलगा झाला त्यांचे पंजाबराव उर्फ विठ्ठल असे नामकरण केले.तेंव्हापासून विठोबा महाराज हे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान म्हणून परिचित झाले.त्यानंतर विठोबा महाराज हे शिव झाले. कृतज्ञता म्हणून कै.सुखदेवराव नखाते,माजीमंत्री कै.स.गो.नखाते,कै.तुकारामजी नखाते यांच्या संकल्पनेतून येथे विठोबा महाराज यांचे एक छोटे मंदिर उभारले होते.या जिर्ण मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम नखाते परिवाराने पुर्ण केले