आकाश वडघुले यांना समाजप्रबोधन रत्न उत्कृष्ठ निवेदक पुरस्काराने सन्मानित

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

टाकळी भीमा (ता.शिरूर) येथील आकाश उत्तम वडघुले यांना नुकतेच समाजप्रबोधन रत्न उत्कृष्ठ निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार (दि.१०) रोजी सिटी इंडिया न्युज चँनलच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

टाकळी भिमा (ता.शिरूर) येथील युवा शिवव्याख्याते व निवेदक आकाश उत्तम वडघुले यांनी आपल्या जादुई आवाजाने लोकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करत शिवचरित्र, व्याख्याने, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा यांसारख्या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे काम केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत सिटी इंडिया न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना छञपती संभाजीनगर येथे समाज प्रबोधनरत्न उत्कृष्ट निवेदक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर तालुका अध्यक्ष रविबापु काळे, जिवनभाऊ चौधरी, भालचंद्र पिंपळवाडकर, जितेंद्र विसपुते, डॉ.संतोष जाधव,आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे,प्राचार्य तुकाराम बेनके, सिटी इंडिया न्युज चँनलचे मुख्य संपादक गणेश चौधरी, उपसंपादक संदिप पांचाळ, सचिन चौधरी, गणेश पवार, साई शेलार, संजयआबा काळे, निखिल कंधारे, जितेंद्र थिटे, एकनाथ थोरात आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिटी इंडिया न्युज चँनलचे मुख्य संपादक गणेश चौधरी यांनी केले तर आभार संदिप पांचाळ यांनी मानले.