परळी (दि. 08) - श्रावण सोमवार व पुत्रदा एकादशी असा सुंदर संगम आज साधला असून, यानिमित्ताने माजी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
धनंजय मुंडे यांनी आज सकाळी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेतले व विधिवत पूजन केले. मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील 7 क्विंटल फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे, पवित्र श्रावण महिन्यात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात; त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
*आप्पासाहेब गोरे
रफतार मीडिया औरंगाबाद