औरंगाबाद: शेलुद : (दीपक परेराव) श्रीरामगड संस्थानच्या देव स्थान समितीचा ऐतिहासिक निर्णय शेलुद देवस्थान समितीने प्रभूंच्या पावन शिळा पदन्यास दर्शनासाठी येणाऱ्या श्रीराम भाविक भक्तांना कपाळावर गंध, अष्ट गंध, डोक्यावर रूमाल,टोपी अथवा फेटा घातलेला असावा.महिला भाविक भक्त भगिनींना डोक्यावर साडीचा पदर, मुलींना ओढणी असणे आवश्यक केले आहे. हा निर्णय देवस्थान कमिटीने पाच ऑगस्ट 2022 पासून घेतला आहे. प्रकट श्रीराम नवसाला पावणारा आणि भक्तांना भक्कम आधार असून भयमुक्त, गर्व रहित आणि वासनामुक्त करणारा अत्यंत पावन पवित्र श्रीराम चरण शिलाणन्यास भूमी कृपाशीर्वाद देणारा, मनोहर निसर्गात नटलेला नयन मनोहर असा हा परिसरही तितकाच आनंदानुभव देणारा वनराई ने सुशोभित असा डोंगर देवस्थान डोंगर भुमीवर वसलेला केशवराज आहे. दर्शन घेणारा वर्ग हा शिस्तबद्ध आणि एकसंघ असावा यासाठी संस्थान तर्फे हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे.तरी श्रीरामगड क्षेत्र प्रभू द्वारा येथे प्रभूची दर्शन घेताना भाविकांनी वरील नियमाचे पालन करावे अशी विनंती तीर्थ क्षेत्र श्रीरामगड पावन शिला देवस्थान समिती शेलुद छ. संभाजीनगर तर्फे सर्व भाविकांना करण्यात येत आहे आणि हिंदू समाज संघटन शिस्तबद्ध व एक संघ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असे देवस्थान समितीतर्फे सूत्रांनी माहिती दिली आहे.