शिरुर दिनांक (वार्ताहर ) पुणे नगर महामार्गावर सरदवाडी येथे कार ने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला . ठार झालेल्याचे नाव प्रशांत नंदकुमार पोलशेटवार वय 39 वर्ष सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा -पुणे मूळ राहणार इतवार बाजार नांदेड. असे आहे . याबाबत शिरुर पोलीसानी दिलेल्या माहिती नुसार गजानन नंदकुमार पोलशेटवार यांनी अपघतासंदर्भात फिर्याद दिली आहे . दिनांक 7 जून 2023 रोजी रात्री 11/00 वाजेच्या सुमारास सरदवाडी येथे पुणे नगर हायवे रोडवर नांदेड येथे गावी जाण्यासाठी प्रशांत नंदकुमार पोलशेटवार हे रोडच्या कडेला थांबले असताना पुणे बाजूकडे नगर बाजूकडे जाणारे रोड वरून मारुती कंपनीची ईरटीका गाडी नंबर एम .एच .१४ ई.यु २०९६ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही हयगयीने अविचाराने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून पुणे नगर हायवे रोडवरील सरदवाडी येथील स्पीड ब्रेकर वर गाडी कंट्रोल न झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला प्रशांत याना जोरात ठोस मारली त्यात प्रशांत यांच्या डोक्याला व तोंडाला हातापायाला गंभीर दुखापती होऊन त्यांच्या मृत्यु झाला . यासंदर्भात अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार देण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शंनाखाली पोलीस हवालदार भगत करत आहे.