शिरूर दिनांक-  वडगाव रासाई , ता शिरुर येथे दत्तात्रय वामन वाघमारे यांच्या बंगल्याचा आवारात गांजाची झाडे आढळून असुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार जनार्दन सुरेश शेळके यांनी फिर्याद दिली आहे . वडगावरासाई येथील निवृत्तीनगर येथे दत्तात्रय वाघमारे यांचे नवीन बंगल्या मध्ये गांजा झाडांची लागवड केलेली मिळुन आली त्याचे विरुध्द एन.डी.पी.एस. कायदा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे . या प्रकरणी आधिक तपास पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस सब इन्स्पेक्टर पवार करीत आहेत .