सणसवाडी मध्ये खुनाचा पुरावा नष्ट करत प्रेत जाळणारे जेरबंद
प्रेम संबंधाला विरोध केल्याचे पत्नी व मुलीने केला इसमाचा खून
( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरूर येथे १ जून रोजी सकाळच्या सुमारास एका मानवी इसमाचा खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकल्याची घटना घडलेली असताना कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करत तिघा आरोपींना अटक केली मात्र सदर गंभीर गुन्ह्यात पत्नी व मुलीने जॉन्सन कॅजीटन लोबो या इसमाचा खून केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी मृताची पत्नी सेंड्रा जॉन्सन लोबो, ॲग्जेल जॉय कसबे या दोघांसह मयताच्या अल्पवयीन युवतीला ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
सणसवाडी ता. शिरूर एक जून रोजी एका इसमाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला होता, याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास केला असता सदर ठिकाणी एक कार दिसून आली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार जनार्धन शेळके, राजु मोमीन, योगेश नागरगोजे, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, सचिन होळकर, चंद्रकांत काळे, मुकुंद कदम, पोलीस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, निखील रावडे, किशोर शिवनकर, महिला पोलिस नाईक किरण निकम यांसह आदींनी सखोल तपास करत पुणे नगर महामार्गावरील दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासात अखेर कारच्या ठिकाणी पोहोचले असता जॉन्सन लोबो हा इसम चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली त्यावेळी पोलिसांनी कार मालकाचा शोध घेत कार जॉय कसबेयांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मुलगा ॲग्जेल कसबे याने कार नेल्याचे समजले, पोलिसांनी ॲग्जेल याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते मात्र त्या प्रेम संबंधाला तिच्या आईची संमती असून वडिलांचा विरोध होता त्यामुळे सदर इसमाच्या मुलगी आणि पत्नीने इसमाचा खून करून मृतदेह पोत्यात ठेवून ॲग्जेल कसबे यांच्या मदतीने कारमधून सणसवाडी मध्ये घेऊन जात पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे सांगितले, दरम्यान पोलिसांनी मयातची पत्नी सेंड्रा लोबो सह त्याच्या अल्पवयीन मुलीकडे चौकशी केली असता त्यांनी वेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहून सदर गंभीर गुन्हा केल्याची कबुली दिली, यावेळी पोलिसांनी खून करणारी मृताची पत्नी सेंड्रा जॉन्सन लोबो वय ४३ वर्षे रा. गुडवील वृंदावन सोसायटी आनंद पार्क वडगाव शेरी पुणे, ॲग्जेल जॉय कसबे वय २३ वर्षे साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे या दोघांसह एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेत अटक केली असून तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सेंड्रा जॉन्सन लोबो, ॲग्जेल जॉय कसबे या दोघांना ९ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलीस हवालदार सचिन होळकर हे करत आहे.