तळेगाव ढमढेरे येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आनंदाश्रम शाळेमध्ये शिरूर तालुका निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदाश्रम शाळेत विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत. तीन वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात लावलेलेल्या १०० वृक्ष डेरेदार असल्याचे समता विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी यांनी सांगितले.

यावेळी समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ, सामाजिक कार्यकर्ते शहाजी ढमढेरे, योगेश ढमढेरे, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ कऱ्हेकर, रोहिदास ढमढेरे, गणेश ढमढेरे, दिलीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.