शिरूर तालुक्यातील चौदा वर्षीय मुलगी अत्याचाराने गरोदर

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

शिरूर शहरात सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता शिरूर तालुक्यात चौदा वर्षीय मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचाराने मुलगी गरोदर राहिल्याची घटना घडली असल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे रतीलाल चून्या कुवर याचे विरुद्ध बलात्कार सह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव सांडस ( ता. शिरूर) येथे राहणारी पीडित चौदा वर्षीय मुलगी ही तिच्या घरी असताना रतीलाल कुवर हा सदर मुलीला घरात बोलावून घेत बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत होता, घडलेला प्रकार कोणास सांगितला तर तुला जीवे मारेल अशी धमकी देखील रतिलाल पीडित मुलीला देत होता, मात्र घडलेल्या प्रकारानंतर मुलीने घाबरून कोणासही काही सांगितले नाही मात्र मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने मुलगी गरोदर असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला, घडलेल्या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरूर पोलिसांनी रतीलाल चून्या कुवर सध्या रा. रांजणगाव सांडस ( ता. शिरूर ) जि. पुणे मुळ रा. वालापागण ता. साक्री जि. धुळे याच्यावर युद्ध पालैंगिक अत्याचार सह बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले या करत आहे.