शिरूर तालुक्यातील एका महिलेला मारहाण करत विनयभंग
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील आपटी येथे किरकोळ वादातून महिलेसह महिलेच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विनय विजय भालेराव, ऋषिकेश गणपत भालेराव, संगीता सुनील भालेराव, सुनिता विजय भालेराव व विवेक विजय भालेराव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आपटी (ता. शिरुर) येथील एका महिलेने घरामागे मुरूम टाकलेला असताना त्यावरून गावातील एका इसमाने गाडी नेल्याने महिलेने तुला गाडी न्यायला दुसरी जागा नव्हती का असे म्हटले असता विनय भालेराव याने महिलेला शिवीगाळ केली होती, त्यांनतर दुसऱ्या दिवशी महिला तिच्या मुलासोबत बोलत असताना पुन्हा विनय भालेराव, ऋषिकेश भालेराव, संगीता भालेराव, सुनिता भालेराव व विवेक भालेराव यांनी महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली तर विनय व आदींनी महिलेच्या अंगावरील कपडे फाडत महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले, यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील पडून गहाळ झाल्याचे महिलेने म्हटले असून याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी विनय विजय भालेराव, ऋषिकेश गणपत भालेराव, संगीता सुनील भालेराव, सुनिता विजय भालेराव व विवेक विजय भालेराव (सर्व रा. आपटी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.