एसटी वाहकास मारहाण करून फरार असणाऱ्या आरोपीच्या सोळा वर्षानंतर पाचोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या 

पाचोड (विजय चिडे) सोळा वर्षांपूर्वी पैठण तालुक्यातील मुरमा शिवारात एका एस.टी.बस वाहकास मारहाण करून फरार झालेल्या आरोपीला मध्यप्रदेश मध्ये पकडण्यात पाचोड पोलिसांना (दि.२५) यश आले असून सदर घटना २००७ साली घडली होती.

पाचोड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

२००७ मध्ये मुरमा शहरातील एका कापसाच्या जिनिंग मध्ये मध्यप्रदेशातील काही मंजूर आले होते. त्यातील भाउसिंग डुका वास्कले उर्फ मानठाकूर यांच्यासह त्यांचे नातेवाईक देखील कामावरती होते. भाउसिंग वास्कले यांचे एक नातेवाईक जिनिंग करून पाचोड कडे जात असताना बीड कडून येणाऱ्या महामंडळाच्या बसने त्यांना उडविले होते. त्यावेळी अपघात झाला असता बस चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यावेळी बसमधील वाहक हा खाली उतरून जखमींच्या नातेवाईकांची समजून सांगण्याचा प्रयत्न करत असता त्या बस वाहकास भाऊसिंग वास्कले यांच्यासह सात ते आठ जणांनी मारहाण करून

शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये सात ते आठ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पाचोड पोलीसांनी यातील तिघां जणांना ताब्यात घेतले होते.परंतु यातील भाउसिंग हा 2007 पासून फरार होता.मात्र गुप्त बातमीदार मार्फत पाचोड पोलिसांना माहिती भेटली की भाउसिंह हा सध्या मध्यप्रदेशातील जामण्यापाणी, ता. पानस्मल,जि. बडवाणी मध्ये राहत असून तो तिथे कामावरती आहे. यावेळी तात्काळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी एक पथक तयार करून त्या पथकास मध्यप्रदेश येथे पाठवले असता पथकांने स्थानिक पोलिसांच्या मदतीने भाउसिंग यास जामण्यापाणी, ता.पानस्मल, जि. बडवाणी येथुन ताब्यात घेऊन पाचोड पोलीस ठाण्यामध्ये हजर केले आहे ही कारवाई पाचोड पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक रवींद्र आंबेकर, पोलीस पवन चव्हाण पोलीस कर्मचारी संदीप पाटेकर पार पाडली आहे.