छत्रपती संभाजी नगरात दिव्य ज्योती फाउंडेशनच्या वतीने आर्ट ऑफ लिविंग डे उत्साहात साजरा

 छत्रपती संभाजीनगर/

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील दिव्य ज्योती फाउंडेशनने आंतरराष्ट्रीय आर्ट ऑफ गीव्हींग डे च्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा दिवस साजरा केला या अंतर्गत सकाळी शहरात कचरा साफ करणाऱ्या घंटागाडी वरील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना भेट वास्तूंचे वाटप करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपली सेवा करणाऱ्यांचे उपकार मानण्याचा एक नवाच पायंडा या तरुणांनी समाजाला घालून दिला संध्याकाळी लहुजी साळवे आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले विकास मंच संचलित किशोरी विकास प्रकल्प वडगाव कोल्हाटी या विविध ठिकाणी त्यांनी शालेय प्रवाहातून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता व्याख्याने देऊन त्यांना प्रवृत्त केले याप्रसंगी फाउंडेशनचे निकेश मदारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण आपल्या ध्येयाप्रती जागृत राहून यश गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे संबोधित केले तसेच प्रकल्प संचालक डॉक्टर दिवाकर कुलकर्णी यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना देण्याची वृत्ती विकसित करण्यासाठी आपण स्वतः बलशाली व्हावे अशा शब्दात आवाहन केले फाउंडेशनचे गणेश मुंढे यांनी दिव्य ज्योती फाऊंडेशन करत असलेल्या कार्याबद्दल उपस्थित त्यांना माहिती करून दिली एडवोकेट जोगेंद्रसिंह चौहाण यांनी अध्यक्षीय समारोप करताना भविष्यात अनेक उपक्रम दिव्य ज्योती राबवणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवाजीराव घुगे यांनी केले तर कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे अशोकराव भोसले विश्वजीत जैन आदींची उपस्थिती होती