राजापूर : भारतीय जनता पार्टी राजापूर तालुका महिला मोर्चा यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार वितरण कार्यक्रम श्री मंगल कार्यालय राजापूर येथे नुकताच पार पडला. यावेळी राजापूर शहर व राजापूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व नारी शक्तींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. ऐश्वर्या ताई जठार, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, ओ. बी. सी. महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्राजक्ता रुमडे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष सौ. तनया शिवलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ. राजश्री मोरे, सौ. शीतल पटेल, भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, सरचिटणीस ऍड. सुशांत पवार, मोहन घुमे, महिला मोर्चा उपाध्यक्ष श्रीम. शीतल रहाटे, सौ. अनिता पांचाळ सौ. सोनाली केळकर, सौ. रेणुका गुंडये, सौ. रसिका कुशे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजापूर शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नारीशक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी राष्ट्र सेविका समिती राजापूर शाखा, गीता संस्था वर्ग गुजराळी, राजापूर महिला ढोल पथक, राजापूरातील महिला भजन मंडळे, या सर्व सन्मानित महिलांनी आपापल्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. भाजपा महिला तालुका अध्यक्षा सौ. श्रुती ताम्हनकर यांनी या कार्यक्रमाचे सुनियोजित, शिस्तबद्ध, असे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. सुयोगा जठार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् राष्ट्रगीताने झाली.